Tuesday, July 16, 2013

Marathi Article: लाज विकणारया जाहिराती

जाहिरात ही पासष्ठावी कला मानली जाते. आजच्या आधुनिक जगाने मात्र बाकीच्या सर्व कलांना बाजूला बसवून जाहिरात कलेला राजसिंहासनाचा मान दिला आहे. या कलेच्याच जोरावर आज अनेक कंपन्या आणि त्यांची उत्पादने जगावर राज्य करत आहेत. वास्तविक त्याबाबत तक्रार करण्याचे कारणही नाही. परंतु आता या कलेने बीभत्सपणा व अश्लीलतेचा जो आधार घेतला आहे तो नक्कीच आक्षेपार्ह मानवा लगेल. कोणतेही उत्पादन घ्या, त्याची जाहिरात करण्यासाठी लैंगिकता, वासानांधता आणि स्त्री-देह प्रदर्शनाचा मार्ग व्यापारी कंपन्यांनी स्वीकारला आहे.

Effect of Vulgar Advertisements


टीव्ही हे आता सर्वांच्या करमणुकीचे एकमात्र माध्यम बनले आहे. त्यावरील जाहिराती कुटुंबातील सर्वजन एकत्र बसून पहात असतात. याचेही भान आता या विक्रेत्यांना राहिलेले नाही. जाहिरात साबणाची असो, दागिन्याची असो, कपडयांची असो कि मोबाईल फोनची असो, त्यातली अभिरुची हीन आणि स्त्रैण होत चालली आहे. त्यातही पुरुषांची अंतर्वस्त्रे, "डीओ" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉडी स्प्रेच्या जाहिराती केवळ प्रक्षोभकच नव्हे तर उछ्रखलता आणि असभ्यपणाची मूर्तिमंत उदहरणे ठरतील. घरातील लहान मुलां-मुलींवर अशा जाहिरातींद्वारे आपण कोणत्या संस्काराचा अभिषेक करत आहोत?

या आधुनिक संस्कृतीची विकृती ही की तिथे फक्त विक्रयकलेला स्थान आहे. तुमच्याकडे विकण्यासारखे जे कांही आहे ते विका, त्यासाठी "गिऱ्हाईक" तयार करा हा नवा मंत्र जपला जात आहे. ही "विक्री" करताना आपण कोणत्या मूल्यांचा बळी देत आहोत, सभ्यतेच्या कोणत्या मर्यादा ओलांडत आहोत याचीही फिकीर उरलेली नाही. जी गोष्ट तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसह एकत्रितपणे  पाहणे-ऐकणे लज्जास्पद वाटत असेल ते  "अश्लील" असे समाजशास्त्रज्ञ मानतात. या व्याख्येनुसार आज टीव्ही, वृत्तपत्रे व सर्व प्रसारमाध्यमे अश्लिलच ठरतील. या जाहिरात कलेचे रोज नवनवे विवस्त्र आविष्कार बघून कालौघात कदाचित आपली नजरही मरुन जाईल व हा नंगानाच पाहूनही त्याचे कांही न वाटण्याइतके संवेदनाहीन होऊन जाऊ अशीही शक्यता आहे. कदाचित सभ्य-असभ्य, श्लील-अश्लील यांच्या व्याख्याही या नव्या लाटेत बदलून जातील. पण तोपर्यंत तरी आमच्या संस्काराची बूज न राखणाऱ्या या जाहिरातींना आवर घातला पाहिजे!



ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

4 comments:

  1. Agadi manatla bolalat tumhi. Yesterday me and my husband was talking of the same topic. Ads like Axe, Fastrack and manforce are really vulgar. We can stop children from watching vulgar shows, but we can't stop them from watching such stupid ads.I am going to complaint about this to the consumer board.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Sarika. I can not agree more. Rightly said.

      Delete
  2. Khup chan ahet tumche vichar ani post suddha

    ReplyDelete