Wednesday, July 31, 2013

Marathi Poem: एकच… (मराठी हृदयस्पर्शी कविता)

(मूळ कवी: अज्ञात)

Marathi Kavita: Ekach


एकच चहा, तो पण कटींग…
एकच पिक्चर, तो पण टॅक्स-फ्री…
एकच साद, ती पण मनापासून…
अजून काय हवे असते मित्राकडून?एकच कटाक्ष, तो पण हळूच…
एकच होकार, तो पण लाजून…
एकच स्पर्श, तो पण थरथरुन…
अजून काय हवे असते प्रियेकडून?एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवून…
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून…
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हसडून…
अजून काय हवे असते आजीकडून?एकच मायेची थाप, ती पण कुरवाळून…
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून…
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून…
अजून काय हवे असते आईकडून?एकच कठोर नकार स्वैराचाराला, तो पण हृदयावर दगड ठेवून…
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगऱ्या आवाजातून…
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहून…
अजून काय हवे असते वडिलांकडून?सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून…
स्वर्गच जणू मला मिळाला, तो पण न मरून…
फाटकी की झोळी माझी, ती पण वाहिली भरून…
अजून काय हवे आहे मला आयुष्याकडून?
ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

2 comments: