Saturday, August 31, 2013

Marathi Story: असा गुरु, असा शिष्य

Mentor

गिर्यारोहकांची एक तुकडी एक अवघड शिखर सर करण्यासाठी चालली होती. वाट खूप अवघड व धोकादायक होती. वेळेत शिखरावर पोहोचू शकणार नसल्याची जाणीव होताच सर्वांनी बेस कॅम्पवर परतण्याचे ठरवले. पण एक जिद्दी गिर्यारोहक तसाच पुढे चालत राहिला. शिखर जवळ आले पण तेवढयात अंधार पडला. तरीही तो चालत राहिला व दुर्दैवाने अंधारात पाय घसरून पडला आणि खोल दरीत कोसळू लागला. कोसळत असताना त्याला जाणवले की  या प्रचंड उंचीवरून खाली पडल्यानंतर त्याच्या देहाच्या चिंधड्या उडणार आहेत. तो जीवाच्या आकांताने ओरडला,

"गुरुजी मला वाचवा … वाचवा … "


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

Tuesday, August 27, 2013

Marathi Article: न्यायला स्टे!

भारतातल्या कायद्याची अनेक वैशिष्ठ्ये आहेत पण त्यातले सर्वात महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याची लवचिकता. कायदेतज्ज्ञाना त्याचा हवा तसा अर्थ काढून न्यायाधीशांसमोर वर्षानुवर्षे शब्दांचा कीस काढता येतो. दुसरे वैशिष्ठ्य असे कि एका निरपराध्याला शिक्षा व्हायला नको म्हणून शंभर गुन्हेगार सोडून देण्याची पळवाट  त्यात आहे. तिसरे सर्वात महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे न्यायाला विलंब म्हणजे न्यायला नकार.
Justice delayed is justice denied 
या बोधवाक्याला हरताळ फासत खालच्या कोर्टातून वरच्या आणि तिथून आणखी वरच्या कोर्टात आणि नंतर खंडपीठात असे वर्षानुवर्षे रेंगाळणारे खटले.

Indian Judicial System


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

Saturday, August 24, 2013

Marathi Story: बिनविरोध स्पर्धा

कोणतीही स्पर्धा म्हटली की  तेथे असंख्य स्पर्धक आले. त्यांची एकमेकांवर मात करण्याची धडपड आली. जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि शेवटी इतरांना पराभूत करून विजयी ठरणाऱ्या वीरांचा सन्मान. पण १९०८ सालच्या लंडन ऑलीम्पिकमध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत एक अघटितच घडले! स्पर्धेत एकटाच खेळाडू धावला आणि सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी तीनही पदके त्या एकाच भाग्यवान खेळाडूला देण्याचा अजब विक्रम घडला. या ब्रिटीश खेळाडूचे नाव विंडहॅम हाल्सवेल!ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

Wednesday, August 21, 2013

Marathi Story: जगज्जेता सिकंदर आणि तांब्याभर पाणी

जग जिंकायला निघालेला सिकंदर लढाया करीत विशाल वाळवंटात भरकटला. पाण्याअभावी त्याचे सर्व सैन्य मागे राहिले. पाण्याचा शोध घेत सिकंदर पुढे निघाला. त्याला खूप तहान लागली होती. घसा कोरडा पडला होता. पाणी मिळेल या आशेने तो पुढे जात राहिला. मृगजळाने फसवूनही तो चालत राहिला. पाणी मिळाले नाही तर आपण जिंकलेल्या राज्याचा उपभोग घेण्यासाठी जिवंतही राहता येणार नाही या विचाराने तो विलक्षण खिन्न झाला.

Marathi Shortstory: Alexander The Great and Water


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

Saturday, August 17, 2013

Marathi Article: तारे जमींपर

हार्मोनिअम वाजविण्याचे माझे एक स्वप्न आहे. आजही ते स्वप्नच राहिले कारण नोकरी-व्यवसायाच्या धकाधकीत  आयुष्य अस्ताला लागले तरी या छंदाला मला न्याय देत आला नाही. अर्थात हर्मोनिअम वाजवून पोट भरता येणार नाही याची जाणीवही मला निश्चित आहे. पण तीन साप्तकातून सात स्वरांची उलगडणारी सुरावट आजही मनाला मोहविते. लहानपणी त्या काळ्या पांढऱ्या  पट्ट्यांवर सफाईदारपणे  फिरणारी पेटीवाल्याची बोटे पाहताना आणि भात्याच्या भोकातून उघडझाप करणारी पुठ्ठ्याची वर्तुळे निरखताना कानाला मधूर  वाटणारे स्वर मनाच्या गाभार्यापर्यंत पोहोचत होते हे निश्चित. म्हणूनच कधी आपल्यालाही अशी बोटे चालविता यावीत असे वाटायचे.

लहानपण तसे अनेक स्वप्नांना जन्म देते. आगगाडीच्या इंजिनाची शिटी वाजवणे असेल किंवा बँडवाल्याच्या क्लिरोनेटवर हात फिरवावासा वाटणे असो. या बालसुलभ स्वप्नांना वगळले तर शालेय जीवनात करियरची स्वप्नं पडू लागतात आणि या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी पूर्वसुरींच्या वाटेने जाण्याचा प्रयत्न केला जातो. अशा वेळी नेहमीच्या मळलेल्या वाटाच निवडल्या जातात आणि छंद नावाच्या स्वप्नाला तडा जातो तो कायमचाच.

follow your dreams


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

Wednesday, August 14, 2013

Marathi Article: लोकशाहीची तिसरी व्याख्या


democracy

अब्राहम लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या खूपच प्रसिद्ध आहे. त्यांची व्याख्या अशी "लोकांनी लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य". मूळ  इंग्रजीतील ती व्याख्या अशी -
By the people, Of the people, For  the people.
पण नंतर या व्याख्येतील फोलपणा जगभरातील राज्यकर्त्यांनी उघड करायला सुरवात केली. जुन्या व्याख्येशी फारकत घेऊन चलाख, बनेल राजकारण्यांनी केलेली दुसरी एक व्याख्या अशी -
Buy  the people (लोकांना विकत घेणारी), Off the people (लोकांचा विचार न करणारी), Far from  the people (लोकांपासून बाजूला गेलेली).
ही व्याख्या सध्या तरी भारतीय लोकशाहीला बऱ्यापैकी लागू पडते. कारण इथे लोकप्रतिनिधींचा घोडेबाजार आता बऱ्यापैकी स्थिरावला आहे.


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

Saturday, August 10, 2013

इंग्रजी भाषेचा आग्रह करू नका (एक लक्षवेधी टेड टॉक्स व्याख्यान)

(मराठी भाषांतरीत मजकुरासाहित)


सध्या जगभरात इंग्लिश ही  एकच भाषा महत्वाची ठरत चालली आहे. पण यामुळे आपण इतर भाषेतील समृद्ध विचार आणि प्रगल्भ कल्पनांना तर दुरावत चाललो नाही ना? बुद्धिमत्ता आणि कल्पकता ही आपल्याला कोणती भाषा येते अथवा येत नाही यावर अवलंबून आहे का? आईनस्टाईन ह्या अग्रगण्य संशोधकाला जर फक्त इंग्लिश भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे संशोधनाची संधी दिली गेली नसती तर आज जग त्याने लावलेल्या असंख्य शोधांपासून वंचित राहिले नसते का?
हा विचार करायला लावणारा प्रश्न विचारतात श्रीमती पॅट्रीशिया रायन - इंग्लिश विषय शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असणाऱ्या एक शिक्षिका.


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

Sunday, August 4, 2013

Marathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग २)

(मूळ लेखक: अज्ञात)
मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा
"कसा असतो आईस्ड टी? म्हणजे मी पण तोच घेतो. तसही मला इथला दुसरा पदार्थ किंवा पेय माहित नाही. काहीतरी भलतच घ्यायचो आणि माझी पंचाईत व्हायची!"

"पंचाईत" ह्या शब्दाला ती ठेचकाळली आणि मंद हसली. मला वाटलं की माझ्या बावळटपणाला हसली असेल.

"चांगला असतो", ती म्हणाली आणि आम्ही रांगेतून पुढे सरकलो.

काउण्टरवरच्या माणसाला म्हणालो, "टू आईस्ड टीज प्लीज."

तो अमेरिकेतून डायरेक्ट इम्पोर्ट झालेला असावा. म्हणाला, "व्हिच फ्लेवर सर?"

पुन्हा आली का पंचाईत? मी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पहिले. ती तत्काळ उतरली, "पीच फ्लेवर". ती सराईत होती बहुतेक.

"वूड यु लाईक टू ट्राय आवर क्रीम फ्लेवर, सर?"

मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. कसा दिसतं असेन मी तेंव्हा? ती ठामपणे म्हणाली, "नो, पीच फ्लेवर फॉर मी."

मी जास्त चिकिस्ता न करता आणि वेळ न दवडता उत्तरलो, "पीच फ्लेवर फॉर मी टू."

मला वाटलं ३०-४० रुपये बिल होईल. दोन कप चहासाठी ३०-४० रुपयेदेखील "लई जास्त होत्यात. पन म्हनल ठीक हाय. बरिश्तामंधी आलो आपुन तर तेवढं द्यायाचं पायजे." पण त्याने निर्विकारपणे ९० रुपयांचा आकडा सांगितला. मी काढलेली ५० रुपयांची नोट ठेवून १०० ची काढली. मी पुढचा हिशोब करू लागलो.


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

Saturday, August 3, 2013

Marathi Story: कांदेपोहे (मराठी विनोदी कथा - भाग १)

(मूळ लेखक: अज्ञात)

Marathi Humor Story: Kande Pohe

माझ्या मागासलेपणाचं मला परवा किती वाईट वाटलं! इतकी वर्षे पुण्यात राहून देखील आधुनिक जीवनशैली मला समजली नाही ही खंत अजूनही मनाला बोचते आहे. जरा सविस्तर सांगतो. यंदा लग्नकर्तव्य असल्याने एका मुलीसोबत परिचयभेटीचा कार्यक्रम ठरला. रविवारची दुपार तशी निवांत पहुडण्यासाठी असते ही म्या पामराची भ्रामक कल्पना त्यादिवशी मोडीत निघाली.  दुपारी पावणेतीनच्या सुमारास माझा भ्रमणध्वनीसंच केकाटला. हो, केकाटलाच म्हणेन मी. सकाळची रम्य किंवा सायंकाळची रोमॅटिक वेळ असती तर "किणकिणला" असा मंजुळ शब्द मी वापरला असता. पण भर दुपारी भरपेट जेवण झाल्यावर तेही रविवारी भ्रमणध्वनीसंच (सध्या इंग्लिश शब्द सोडून अतिअवघड मराठी शब्द वापरण्याची प्रथा आहे म्हणून…) बोंबलत असेल तर "केकाटणं" हाच शब्द योग्य आहे असे मला वाटते. असो.


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात