(मराठी भाषांतरीत मजकुरासाहित)
हा विचार करायला लावणारा प्रश्न विचारतात श्रीमती पॅट्रीशिया रायन - इंग्लिश विषय शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असणाऱ्या एक शिक्षिका.सध्या जगभरात इंग्लिश ही एकच भाषा महत्वाची ठरत चालली आहे. पण यामुळे आपण इतर भाषेतील समृद्ध विचार आणि प्रगल्भ कल्पनांना तर दुरावत चाललो नाही ना? बुद्धिमत्ता आणि कल्पकता ही आपल्याला कोणती भाषा येते अथवा येत नाही यावर अवलंबून आहे का? आईनस्टाईन ह्या अग्रगण्य संशोधकाला जर फक्त इंग्लिश भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे संशोधनाची संधी दिली गेली नसती तर आज जग त्याने लावलेल्या असंख्य शोधांपासून वंचित राहिले नसते का?
व्याखानाबद्दल:
दुबईतील TED TALKS मध्ये, अनुभवी इंग्रजी शिक्षिका पेट्रीशिआ रायन हा जिज्ञासा निर्माण करणारा प्रश्न विचारतायत: जगाच्या इंग्रजी भाषेवर असणाऱ्या अतिप्रभावामुळे इतर भाषांमध्ये व्यक्त होणाऱ्या कल्पनांकडे दुर्लक्ष होत आहे काय? (उदा: जर आइनस्टाइनला टोफेल परीक्षा पास व्हावी लागली असती तर?) हा इतर भाषांमध्येही कल्पना मांडू द्याव्यात असा आधार देणारा संवाद आहे.
वक्त्याबद्दल:
श्रीमती पॅट्रीशिया रायन या गेल्या ४० वर्षापासून आरबी देशांमध्ये इंग्लिश शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या दरम्यान त्यांना सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेचे महत्व समजले. सध्या त्या दुबई मधील झायेद विद्यापीठात शिकवत आहेत तसेच कायदेशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. या व्याखानामधून त्या इंग्लिश भाषेप्रमाणे इतर भाषासुद्धा महत्वाच्या आहेत आणि त्या सुद्धा जोपासले गेल्या पहिजेत हा विचार प्रभावीपणे मांडतात.
Excellent Ravi for sharing this information! I really appreciate it.
ReplyDelete