जग जिंकायला निघालेला सिकंदर लढाया करीत विशाल वाळवंटात भरकटला. पाण्याअभावी त्याचे सर्व सैन्य मागे राहिले. पाण्याचा शोध घेत सिकंदर पुढे निघाला. त्याला खूप तहान लागली होती. घसा कोरडा पडला होता. पाणी मिळेल या आशेने तो पुढे जात राहिला. मृगजळाने फसवूनही तो चालत राहिला. पाणी मिळाले नाही तर आपण जिंकलेल्या राज्याचा उपभोग घेण्यासाठी जिवंतही राहता येणार नाही या विचाराने तो विलक्षण खिन्न झाला.

त्याचवेळी एक फकीर त्याच्यासमोर आला. सिकंदराने त्याच्याकडे घोटभर पाणी मगितले. पण फकीर म्हणाला, "हे पाणी मला हवे अहे. तुला ते मी देवू शकत नाही."
सिकंदर म्हणाला, "मी जगज्जेता सम्राट अहे. माझे विशाल साम्राज्य, माझी संपत्ती हवी तर घे. पण मला तुझा पाण्याचा तांब्या दे."
फकीर भडकला व म्हणाला, "तू कितीही मोठा राजा असलास, तुझे साम्राज्य कितीही विशाल असले तरी जगज्जेता असूनही आज पाण्यासाठी तू भीक मागतो अहेस. तुझे राज्य देवूनही तुला घोटभर पाणी मिळणार नाही."
त्यानंतर मात्र फकिराने त्याला आपला पाण्याचा तांब्या दिला. अधाशासारखे त्यातले पाणी सिकांदाराने पिऊन टाकले. त्याचा तगमगणारा जीव शांत झाला.
"तुला हवं ते माग", सिकंदर समाधानाने फकिराला म्हणाला.
"मी तर एक फकीर आहे. मला संपत्तीचा मोह नाही. या रखरखीत वाळवंटात तुझ्या साम्राज्यापेक्षा मुल्यवान असणाऱ्या पाण्याचाही मी मोह धरला नाही. मी तुला ते देवून टाकले. यावरून तू लक्षात ठेव, संपत्ती, साम्राज्य आणि आपले स्थान याचा अहंकार कधीही बाळगू नकोस. तुझ्यासारख्या सम्राटाला पाण्यासाठी भिकारी बनावे लागले. तू रिकाम्या हाताने पृथ्वीवर आला आलास आणि रिकाम्या हातानेच परत जाणार आहेस. संपत्ती आणि सत्तेची हाव बाळगण्यापेक्षा गरीबांना निवारा दे. पाणी दे. त्यातच तुझ्या जीवनाचे सार्थक आहे. तांब्याभर पाण्याची किंमत तुला आज समजली आहे. तू जलदान करून यापुढे लोकांना जीवनदान दे."
फकिराच्या उपदेशाने जगज्जेत्या सिकंदराचे डोळे उघडले. आपल्या साम्राज्याचा त्याचा गर्व क्षणात उतरला आणि एका तांब्याभर पाण्यासाठी आपली झालेली दुर्दशा ओळखून मरताना आपले दोन्ही हात बाहेर ठेऊन स्मशानात नेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आपण रिकाम्या हाताने जगात आलो व रिकाम्या हाताने जाणार हा संदेशच यातून त्याने दिला!
No comments:
Post a Comment