Saturday, September 7, 2013

Marathi Article: हे कसले प्रजासत्ताक?

एकदा  कोल्हापुरात वाहतूक पोलिसांनी काही लहान मुलांना मोटर सायकल चालवत असताना अडवले व पोलिस स्टेशनमध्ये नेले. तेथे त्यांची चौकशी केली. या छोटयाशा गोष्टीची मोठी बातमी व्हायचे काहीही कारण नव्हते. पण ती बातमी झाली. 'प्रजासत्ताक' नावाच्या संघटनेच्या पदाधिकारयानी त्या पोलीस ठाण्यात जाऊन फोटो काढले व मुलांचा मानसिक छळ होत असल्याबद्दल बालहक्क आयोगाकडे व जिल्हा पोलीस अधिक्षकाकडे "ई " मेल द्वारे निवेदन दिले अशी बातमी एका सामाजिक जाणीवेने सदैव भारलेल्या वृत्तपत्रातून छापूनही आले.

Kid Driving Car

खरे पहिले तर लहान मुलांना मोटरसायकल चालवू देणारे पालक हे या प्रकरणातले पहिले आरोपी आहेत. या मुलांचा मानसिक छळ  पोलिसांनी केला असा कांगावा करणारे भंपक समाजसेवक हे दुसरे आरोपी आहेत. असल्या निरुद्योगी माणसाना रिकामटेकड्या उद्योगांना प्रसिद्धी देणारे पेपरवाले तिसरे आरोपी आहेत.

एकीकडे पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालतात अशी तक्रार करायची आणि दुसरीकडे अल्पवयीन मुलांना वाहन चालवल्याबद्दल पोलिसांनी धरले तर मुलांना ' मानसिक त्रास ' दिल्याबद्दल तक्रार. या मुलांना फरशीवर बसवून ठेवल्यामुळे समाजहिताचा ठेका घेतलेल्या या उपटसुंभाना राग आला. कायद्याच्या चाकोरीबाहेर जाऊन मुलांना गुन्हेगारा सारखी वागणूक दिली जाते असे या मानवतेच्या पुजाऱ्यांना वाटते.

हि घटना छोटी असली तरी फार बोलकी आहे. एकीकडे हिंसाचार आणि अतिरेकी घटनांनी सामान्य जनजीवन प्रचंड धास्तावले आहे. दुसरीकडे संवेदनाहीन, बोथटलेला समाज तात्पुरत्या उथळ प्रतिक्रिया देवून रोजच्या व्यापात हरवून जात आहे. तर तिसरीकडे किरकोळ, छोट्या-मोठ्या घटनांचे अवडंबर माजवून आणि फुसक्या कारणावरून नवे वाद निर्माण केले जात आहेत. बेकायदेशीर वागणाऱ्या मुलांना पोलिसांनी कायदा शिकवला तर त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली म्हणून गळा काढणाऱ्या या ' प्रजासत्ताक 'वाल्यांना खरोखरच कानी काम उरले नाही काय ? का काहीही करून लोकांसमोर आपले नाव व आपली छबी उभी करण्याचाच छंद जडल्याने ते असे उद्याग करत आहेत ?

लहान वयातच कडक शिस्त लाऊन मुलांना कुमार्गावर जाण्यापासून वाचवण्याचे काम करण्याऐवजी सवंग प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बालहक्क आयोगाकडे तक्रारी करण्याचा उफराटा उद्योग करणाऱ्या ' प्रजासत्ताक ' चा शेवट आता प्रजेनेच केला पाहिजे!


ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

1 comment:

  1. In this highly specialised work, warmth is selectively utilized to the steel in a gradual, linear sweep, causing the steel to contract within the path of the sweep because it cools. Vance Metal high precision machining has completed the Certification course of for the ASME U and R Pressure Vessel programs and maintains these stamps in accordance to ASME authorization and designation. There’s an excellent probability Vance Metal’s weldments went into the heating and cooling system on your cruise ship. Automated traces are assembly traces that use robotic staff instead of humans. Automated traces are extremely efficient, and fewer more likely to|prone to} yield errors.

    ReplyDelete