महिलांवरील वाढत्या अत्याचारांना त्यांचे तोकडे पोशाख जबाबदार आहेत असे मानणार्याना 'मुहतोड' जवाब देण्यासाठी महिलांनी मध्यंतरी 'जीन्स डे ' साजरा केला. मुलींच्या कपड्यांना नावे ठेवणार्याच्या वृत्तीला हाणून पाडण्यासाठी युवतींनी 'जीन्स डे' पाळला म्हणे. लहान, अश्राप बालिकांवर बापाने, मुलाने अत्याचार केल्याच्या बातम्या येतात तेव्हा त्याला पोशाखाच जबाबदार असतात का असाही 'बिनतोड सवाल' या आधुनिक झाशीच्या राण्यांनी केला आहे!
हल्ली चित्रपटात, टीव्हीवर, वृत्तपत्रातून स्त्री-देहाचे जे 'दर्शन' घडते ते सभ्यतेच्या मर्यादेत बसते का हा प्रश्न या मुलींना का पडत नाही? जाहिरात पुरुषाच्या अंतर्वस्त्राची असो कि फर्निचरची असो, त्यात अल्पवस्त्रातील मादक तरुणी आपले अंगप्रत्यंग दाखवते तेव्हा त्यामुळे पुरुषांच्या वासना चाळवल्या जातात ही वस्तुस्थिती नाही का? पुरुषाचे मन रिझवणे ही पुराणकाळापासून स्त्रीने स्वत:वर घेतलेली जबाबदारी आहे. विश्वमित्राचा तपोभंग करणे हे तिने स्वीकारलेले आव्हान होते. परिणामत: 'स्त्री ही पुरुषाची भोगदासी आहे' इथंपासून ते 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे' अशा सुविचारात तिला गुंडाळून टाकण्यात आले आहे.
स्त्रीला 'जीन्स'मध्ये पाहण्यातले नेत्रसुख पुरुषांना हवे आहे आणि त्याला बळी पडणार्या स्त्रिया भ्रामक बाणेदारपणातून 'जीन्स घालण्याचा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही' अशा घोषणा देत आहेत.
स्त्रियांनी आपल्या मर्यादेत रहावे, 'लक्ष्मणरेषा' ओलांडू नये अशा प्रकारचे इशारे कुणी दिले तर त्यात चवताळण्यासारखे काय आहे? पुरुषांच्या वासना भडकवणारे कपडे घातले आणि त्यानंतर पुरुष उद्दीपीत झाला तर त्याची जबाबदारी कोणाची? 'मुलगी झाली हो' म्हणून जो समाज दु:खी होतो त्या समाजात स्त्रियांचे प्रमाण चिंताजनकरित्या खालावले तर पुरुषांच्या वासनांधतेला खतपाणीच मिळणार नाही का?
जीन्स घालण्यासाठी विरोध झाला म्हणून कॉलेजच्या एवढया तरुणी धाडस करत असतील तर त्यांच्या सहाय्यासाठी समाजनियम, नैतिकतेची चौकट कशाला? त्यांनी खुशाल जीन्स घालाव्यात, फॅशन म्हणून त्याला भोकेही पाडून घ्यावीत आणि त्यामुळे तरुण हबकले तर त्यांना 'सरळ' करण्यासाठी हातातल्या बांगडयाही काढून ठेवाव्यात. मग मात्र समाज असा सुस्त का आणि महिलांचे जीवन असुरक्षित का असे या तरुणी विचारू लागल्या तर त्यांना 'इट्स युवर चॉइस' एवढेच उत्तर ध्यावे लागेल!

You know something what Mr.blogger. You have very cheap mentality as the rapists are having.
ReplyDeleteMr. Blogger, your thoughts are so backward type.. Write something that can make awareness in society and can help to change the mentality of violent people's..

ReplyDeletenice
ReplyDeleteमुलानी मादक कपडे घातले तर स्त्रिया अत्याचार नाहीत करत...
Deleteपुरुष का control करु शकत नाही....
हा स्त्रियाच्या Freedom च सवाल आहे...