मुलांना शिक्षण द्यायचे म्हणजे त्यांच्या शाळेच्या फी भरायच्या, त्यांना पुस्तके-वह्या, युनिफॉर्म, स्कूल बॅग्ज, बूट वगैरे साहित्य घेऊन द्यायचे. ऋतूमानाप्रमाणे त्यांना छत्री, रेनकोट, कॅप किंवा स्वेटर द्यायचे. शाळेच्या कार्यक्रमात भाग घेत यावा यासाठी ज्या ज्या वेळी उपक्रम असतील त्याचे वेगळे शुल्क भरायचे. सहली निघाल्या कि मुलाची वर्णी लावायची. खेळाचे, गायनाचे, चित्रकलेचे वर्ग लावायचे. गणित, इंग्रजी, सायन्ससारख्या महिषासूर, भस्मासूर किंवा नरकासुराचा वध करण्यासाठी खास ट्युशनास्त्रांचा उपयोग करायचा.
याशिवाय वयोमानाप्रमाणे कधीतरी कौटुंबिक सहल किंवा पिकनिक काढून त्याला मनसोक्त हुंदडायला द्यायचे. कधीतरी आईस्क्रीमसाठी आरडाओरडा करून मुलांनी घर डोक्यावर घेतले की तीन-चार प्लेट्स पोटात घालून त्यांचे डोके शांत करायचे.
अशा शैक्षणिक मागण्यांची यादी वयाप्रमाणे आणि मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत राहते. लहानपणीच ज्याची यादी लांबलचक असते ती अधिक रुंद आणि जाड होऊ लागते. गुणवत्तेचा काटा सगळ्यांच्या बाबतीत उत्तर दिशा दाखवेल असे नाही. पण इतर कोणत्याही कारणाने पालकांचा काटा काढण्याची एकही संधी सोडली जात नाही. पालकही गुणवत्तेच्या दर्जाऐवजी शाळांचा, महाविद्यालयांचा दर्जा, अक्रिडेशन आणि परंपरा तपासून काळजी घेतली की झाले. केवळ पैशाची तरतूद करून आपले कर्तव्य पार पाडण्याची काळजी घेतात.
पाल्य डोक्यात राख घालून घेऊ नये म्हणून त्याला मागेल ते देतात. परीक्षेच्या वेळी त्याचे मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून त्याला जरा देखील राग येऊ देत नाहीत. थोडे दिवस केबल वगैरे बंद करून धाक दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. परीक्षेसंबंधीची जागरुकता प्रकट करण्यासाठी पाहुण्यांपुढे आपल्या बंटी-बबलीची आता परीक्षा आहे, लवकर उठवावे लागते, कॉफी - बोर्नव्हीटा करून त्याला अभ्यासाला बसवावे लागते, आता आम्ही कुठे बाहेरगावी जात नाही अशी शेजारसुलभ वाक्येही तोंडावर मारली जातात. नको ते लोढणे घेऊन दिल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा पाल्य परीक्षेच्या दिवसात एकाग्र व्हावा म्हणून मोबाईलची सुविधा बंद केली जाते. टीव्हीच्या खोलीत प्रवेश निषिद्ध केला जातो. आता आई-वडील टीव्हीच्या सिरियल्स पाहताना विद्यार्थी एकाग्रतेने दुसर्या खोलीत अभ्यास करत असेल यावर कोण विश्वास ठेवेल?
एवढी सगळी यथासांग व्यवस्था केली म्हणजे अभ्यासातील प्रगती, ती न होण्याची कारणीमीमांसा, आपल्या पोराचा कल किंवा त्याची आवड न समजणार्या संकल्पना याविषयी काही करावे असे किती पालकांना वाटते हा संशोधनाचा विषय आहे. आपण एवढी सिंहाच्या शिकारीची तयारी करून देवूनही एखाद्या खेड्यातील गरीब मागासवर्गीय विद्यार्थी अधिक गुण मिळवून आपल्या हिंदकेसरीला भुईसपाट करतात हे पालकांच्या लक्षात येत नाही. शाळेत डांबणे, पोटात कोंबणे, मागेल ते रांधणे आणि अंडी उबवण्याची वाट बघत बसणे हा शुध्द वेडाचार आहे.
मुलाच्या मनाचा, मेंदूचा जराही विचार होत नाही. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, मुलांना हळुवार हाताळा, त्यांच्या चूका समजून घ्या, सर्व मुले एकाच प्रकारची नसतात. किंबहुना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये अन्य कांही लोकोत्तर कार्य करण्याची उर्जा असू शकते. पण केवळ कॅम्पसवर डोळा ठेऊन पॅकेजशी अनुसंधान बांधणार्या पालकांना जाग येते त्यावेळी बालक पालकांपासून दूर गेलेले असते. 'या चिमण्यांनो परत फिरा.. ' या गीताला दाद देत नाहीत. मग चिमणीएवढे तोंड करून माझे काय चुकले असे पालक स्वत:लाच विचारू लागतात. भानावर आले तर 'अपराध मीच केला' म्हणतात. तंद्रीतच राहिले तर आमचं नशीबच खोटं म्हणतात...

[Image Attribution: Tim Moffatt]

No comments:
Post a Comment