Sunday, November 10, 2013

मराठी प्रेमकथा: एक होता तो आणि एक ती (भाग २)

(मूळ लेखक: अज्ञात)
मागील भागावरून पुढे चालू: भाग १ इथे वाचा
"माझं लहानपण समुद्रकाठी गेलं..." शब्दांची जुळवाजुळव करत तो म्हणाला...
"सारखा मी समुद्राच्या पाण्यात खेळत असे. आई कॉफी प्यायला हाक मारायची, तसा मी धावत धावत व्हरांड्यात येई आणि खारटलेल्या पाण्यानं खारटलेली बोटं बशीतल्या कॉफीत बुडवून पीत असे.
आता आई राहिली नाही. आणि ते समुद्रकाठचं घरही. पण खारट कॉफीची चव जिभेवर आहे.
खारटलेल्या कॉफीनं मला लहानपणच्या आठवणी पुन्हा भेटतात. ती चव बरोबर सगळं बालपण घेऊन येते..." भरलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला.[image attribution: Ahmed Rabea]

तिचं ह्र्दय भरून आलं - त्याच्या निरागसतेनं.
किती हळुवार होतं त्याचं मन.
मग तीही बोलली... आपल्या दुरवरच्या घराबद्दल, बाबांबद्दल... तिच्या स्वप्नांबद्दल... खरचं खुप छान डेट झाली ती!मग ते पुन्हा पुन्हा भेटत राहीले.
अखेर तिला पटलं, हाच  आपला जीवनसाथी.
तो शांत होता. संयमी होता. हळुवार होता. तिची काळजी घेणारा होता.
मग एके दिवशी दोघांनी ठरवलं आणि लग्न केलं!
चार-चौघांसारखं आयुष्य सुरु झालं आणि दिवस खुप मजेत जाऊ लागले.
एखाद्या परीकथेसारखे.

खरंच त्यांचं आयुष्य खुप सुखी होतं.
ती त्याच्यासाठी सर्वकाही करायची. कॉफीसुध्दा!
आणि हो, त्याच्या बालपणाशी त्याची नाळ जोडलेली राहण्यासाठी चिमुटभर मीठही टाकायची त्या  कॉफीत!
अशीच भर्रकन ४० वर्षं कधी उडुन गेली, ते कळंलच नाही.
एके रात्री तो झोपला, तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी...

काही दिवसांनी ती सावरली.
रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करू लागली.
एकदा सहज म्हणुन त्याचं पुस्तकांच कपाट आवरायला घेतलं असताना तिला त्यात एक चिठ्ठी सापडली.
त्याच्या अखेरच्या दिवसात त्यानं ती कधीतरी लिहीली होती.

"माझ्या प्रिये, मला माफ कर!

आयुष्यभर मी तुझ्याशी एका बाबतीत खोटं वागलो, त्याबद्द्ल मला क्षमा कर! हे एकच असत्य मी तुझ्याशी बोललो... पहिल्यांदा आणि शेवटचं! आयुष्यभर ही खंत मला जाचत राहिली. पण मी कधी तुला खरं सांगण्याची हिंमत करू शकलो नाही...
केवळ तु मला खोटारडा म्हणशील आणि मी तुला गमावून बसेन या भीतीने!
प्रिये, आपण सर्वप्रथम जेव्हा कॉफी पार्लरमध्ये भेटलो, तेव्हा मला कॉफीमध्ये घालण्यासाठी खरं तर साखर हवी होती!

त्या क्षणाला मी इतका नर्व्हस झालो होतो, की मी साखरेऐवजी चुकून मीठ मागितलं वेटरकडे.
आणि मग त्या विषयावरून आपलं संभाषण सुरू झालं म्हणुन मी ते तसंच पुढे चालवून घेतलं...
खारट कॉफी मला आवडत नाही. किती विचित्र चव ती!
पण मला तु खुप आवडतेस...
आणि तुला गमावू नये म्हणुन आयुष्यभर मी खारट कॉफी मी पीत राहिलो...

...आता मरण्याआधी मी तुझ्यापाशी सत्य उघड केलंच पाहीजे  नाही तर हे खोटेपणाचं  ओझं मी पेलू शकणार नाही!

प्लीज - मला माफ करशील?"ऑनलाईन कट्ट्यावरचे नवीन लेख तुमच्या ई-मेल वर आणि फीड-रीडर वर मिळू शकतात

आपल्याला आवडतील असे कट्ट्यावरचे अजून काही प्रकाशित लेख :

19 comments:

 1. खुप सुंदर आहे..

  ReplyDelete
 2. खुप सुंदर. what a dedication!

  ReplyDelete
 3. खर प्रेम सुंदर असत,निरागस असत आणि ते जपण जेवढं अवघड तेवढच मोहकहि , सर्वांनाच नहीं जमत.
  अतिशय सुंंदर प्रेम कथा आहे.

  ReplyDelete
 4. खर प्रेम सुंदर असत,निरागस असत आणि ते जपण जेवढं अवघड तेवढच मोहकहि , सर्वांनाच नहीं जमत.
  अतिशय सुंंदर प्रेम कथा आहे.

  ReplyDelete
 5. प्रिय वाचक रसिक हो बुक कट्टा.कॉम हे सर्व वाचकांसाठी नविन व्यासपिठ सुरू करताना आम्हाला खुप आनंद होत आहे. वाचन संस्कृती वाढ्वणे व सर्व वाचकांपर्यंत मराठी साहित्य पोहचवणे हेच आमचे ध्येय आहे.

  तसेच वाचकांना मराठी व इंग्रजी साहित्य सवलतीच्या दरात मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आमच्या या नविन उपक्रमात आपले सहकार्य लाभावे……

  धन्यवाद !

  टिम बुक कट्टा कॉम.

  http://www.bookkatta.com

  ReplyDelete
 6. पहिल्या भागामध्ये मला चांगलंच हसू आलं.
  दुसऱ्या भागामध्ये मात्र मी नर्व्हस झालो. या मुळे नाही की ही कथा चांगली नाही. ते यामुळे, कारण मी आज पर्यंत जितक्याही कथा कादंबऱ्या वाचल्या आहेत त्याचा शेवट होणे मला कधीही आवडलं नाही.

  ReplyDelete
 7. अप्रतिम खूप छान.

  ReplyDelete